तालुक्यातील लोहरा येथील महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीला २०१२-१३ यावर्षी २ लाखांचे बक्षीस मिळाले होते; मात्र तत्कालीन तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश पूजाअप्पा जिरवणकर यांनी या रकमेचा अपहार केला, तसेच बासंबा पोलीस ठाण्यातील तत्कालीन लेखनिक हवालदार मुरलीधर मुंढे यांनी दोन लाख रुपये रकमेचा धनादेश तंटामुक्त अध्यक्ष व ग्रामसेवकांच्या संयुक्त बँक खात्यावर जमा न करता सदरचा धनादेश तोडून रोख रक्कम तंटामुक्त अध्यक्षाला देऊन अनियमितपणा व कसूर केल्याचे बासंबा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुरेश भगवान भोसले यांच्या फिर्यादीवरून तत्कालीन तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश पुंजाअप्पा जिरवणकर व तत्कालीन लेखनिक हवालदार मुरलीधर मुंढे (सध्या स्वेच्छानिवृत्ती)यांच्या विरुद्ध बासंबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक राजेश मलपिल्लू तपास करीत आहेत.
तंटामुक्ती समितीला मिळालेले बक्षीस परस्पर लाटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:49 IST