सुदृढ बालक स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:29 IST2020-12-29T04:29:00+5:302020-12-29T04:29:00+5:30
हिंगोली : सुदृढ बालक स्पर्धेचे बक्षीस वितरण २७ डिसेंबर रोजी राजयोग मेडिमार्ट हॉलमध्ये पार पडले. दोन वेगवेगळ्या वयोगटात या ...

सुदृढ बालक स्पर्धेचे बक्षीस वितरण
हिंगोली : सुदृढ बालक स्पर्धेचे बक्षीस वितरण २७ डिसेंबर रोजी राजयोग मेडिमार्ट हॉलमध्ये पार पडले. दोन वेगवेगळ्या वयोगटात या स्पर्धा पार पडल्या.
अतिरिक्त पोलीस अधीक्षक यशवंत काळे, डॉ. मुरलीधर तोष्णीवाल यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले. ० ते २ या वयोगटात १५०, तर २ ते ५ या वयोगटांमध्ये १०४ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. परीक्षक म्हणून डॉ. उमा तोष्णीवाल, डॉ. स्वप्नील गिरी, सुनीता मुळे, संगीता चौधरी, डॉ. प्रेमेन्द्र बोथरा, प्रवीण सोनी, रत्नाकर महाजन यांनी काम पाहिले. 0 ते २ वर्षे गटामध्ये प्रथम पारितोषिक शौर्य बुद्धघोष कुरे, द्वितीय पारितोषिक स्पुहा स्वप्नील सोनपावले, तर तृतीय पारितोषिक प्रभास सचिन बंडाळे यांनी पटकावले. २ ते ५ या गटामध्ये प्रथम कीर्ती दिनानाथ घोंगडे, द्वितीय भव्या रितेश पुरोहित व तृतीय पारितोषिक तन्वी विशाल दराडे यांनी पटकावले .बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी अभयकुमार यंबल, प्रदीप दोडल, रवींद्र दोडल, डॉ. प्रशम दोडल, रविशंकर देशपांडे, मिलिंद जैन आदी उपस्थित होते.