वसमत येथे क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:29+5:302021-02-08T04:26:29+5:30
मंत्री नवाब मलिक, साखर महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन ...

वसमत येथे क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण
मंत्री नवाब मलिक, साखर महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन झाले होते. अंतिम सामना संज्जूलाला संघ परभणी व धूम क्रिकेट संघ परभणी यांच्यात झाला. संज्जूलाला संघाने विजय मिळविला. प्रथम पारितोषिक ३० हजार ८० रुपये व ट्रॉफी होते. विजयी संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी आमदार राजू नवघरे, माजी नगराध्यक्ष अ. हाफीज अ. रहेमान यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नम्मू उर्फ अमजद खान, इरफान सिद्दीकी, मोहम्मद साजिद, शेख नवीद, अहेमद जुनेद, चाऊस मसूद, शरीफ शेख तालेब आदींनी परिश्रम घेतले.
फोटो नं. २१