धार येथे जुगार अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:34 IST2021-09-24T04:34:55+5:302021-09-24T04:34:55+5:30

औंढा तालुक्यातील धार येथे झन्ना - मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी ...

Print at the gambling den at Dhar | धार येथे जुगार अड्ड्यावर छापा

धार येथे जुगार अड्ड्यावर छापा

औंढा तालुक्यातील धार येथे झन्ना - मन्ना नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती औंढा नागनाथ पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला असता ९ जुगारी जुगार खेळत असताना आढळून आले. पोलिसांनी जुगाऱ्यांकडून जुगाराचे साहित्यासह रोख रक्कम ६ हजार ४९० रूपये तसेच दोन मोबाईल असा २६ हजार ४९० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलीस नाईक संदीप टाक यांच्या फिर्यादीवरून जीवलाल गंगागीर वंश, सखाराम नारायण रावल (दोघे रा. धार), राम तुळशीराम रावळ (रा. सुकापूर), शिवलाल नारायण कोळी, ज्ञानेश्वर व्यंकूगीर नरूके, शिवाजी घनश्याम नरूके, आकाश सुंदर नरूके, परमेश्वर मोहनगीर नरूके, हरी मोतीगीर मुळे (सर्व रा. धार) यांचे विरूद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Web Title: Print at the gambling den at Dhar