शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

काय सर, तुम्ही पण! परीक्षा केंद्रावर जप्त मोबाईल परत देण्यासाठी प्राचार्याने घेतली लाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 19:06 IST

प्राचार्यास लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले

हिंगोली : परीक्षार्थीचा मोबाइल परत करण्यासाठी चार हजारांची लाच घेणाऱ्या स्व. राधाताई मुसळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यासह एका खासगी इसमास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. ही कारवाई हिंगोली शहराजवळील लिंबाळा (मक्ता) भागात ५ मार्च रोजी केली.

हिंगोली तालुक्यातील लिंबाळा (मक्ता) भागात स्व. राधाबाई मुसळे कनिष्ठ महाविद्यालय आहे. या महाविद्यालयात बारावीचे परीक्षा केंद्र असून, २७ फेब्रुवारी रोजी तक्रारदाराचा मुलगा मोबाइल घेऊन परीक्षेला गेला होता. या ठिकाणी पर्यवेक्षकांनी विद्यार्थ्याचे मोबाइल जप्त करून प्राचार्य पंजाब गव्हाणे याच्याकडे दिले होते. परीक्षा संपल्यानंतर काही विद्यार्थी मोबाइल परत घेण्याकरिता प्राचार्य गव्हाणे यांच्या कक्षाकडे गेले. परंतु, खासगी इसम गोपाल कोंगे (रा. वायचाळ पिंपरी, ता. सेनगाव) याने प्राचार्य गव्हाणे याच्या सांगण्यावरून पाच हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मोबाइल परत करण्यासाठी विनंती केली असता हजार- पाचशे रूपये कमी द्या, असे गव्हाणे म्हणाला. 

त्यानंतर २८ फेब्रुवारी रोजी एका विद्यार्थ्याच्या पालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्या तक्रारीची पडताळणी करून ५ मार्च रोजी पथकाने सापळा रचला. त्यानुसार स्व. राधाताई मुसळे कनिष्ठ महाविद्यालयात प्राचार्य पंजाब गव्हाणे याने चार हजार रुपये लाचेची रक्कम स्वीकारत तक्रारदार यांच्या मुलाचा मोबाइल परत केला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गव्हाणे यास रंगेहात पकडले. याप्रकरणी प्राचार्य पंजाब गव्हाणे व खासगी इसम गोपाल कोंगे याच्याविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप पालवे, अप्पर पोलिस अधीक्षक संजय तुंगार, पोलिस उपअधीक्षक विकास घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विनायक जाधव, प्रफुल्ल अंकुशकर, युनूस शेख, विजय शुक्ला, ज्ञानेश्वर पंचलिंगे, भगवान मंडलिक, राजाराम फुपाटे, गजानन पवार, तानाजी मुंडे, रवींद्र वरणे, गोविंद शिंदे, योगिता अवचार, शेख अकबर यांच्या पथकाने केली.

प्राचार्यांच्या घरात आढळले १४ ॲन्ड्राॅइड मोबाइल...लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने प्राचार्य पंजाब गव्हाणे याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे लाच म्हणून स्वीकारलेले चार हजार, त्या व्यतिरिक्त ९ हजार ६९० रुपये, तसेच एक मोबाइल आढळून आला. या शिवाय आरोपीच्या लिंबाळा भागातील घराच्या झडतीत परीक्षार्थींचे विविध कंपन्यांचे तब्बल १४ ॲन्ड्राॅइड मोबाइल आढळून आले.

टॅग्स :HingoliहिंगोलीAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागEducation Sectorशिक्षण क्षेत्र