शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
2
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
3
वंदे भारत-राजधानी ट्रेनचे तिकीट कमी होईल, तब्बल ५००₹ वाचतील; ९०% लोकांना ट्रिक माहिती नाही!
4
बिहारमधील मतदानापूर्वी प्रशांत किशोर अडचणीत, नव्या गौप्यस्फोटामुळे खळबळ
5
वडिलांनी जमीन गहाण टाकून लेकासाठी 'नवरी' आणली; लग्नाच्या पहिल्या रात्रीच तिनं सगळ्यांची झोप उडवली!
6
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
7
UK च्या पंतप्रधानांचा डबल गेम! आधी भारतासोबत मोठा करार, आता 'या' विरोधी देशासोबत मिळवले हात
8
प्रबोधिनी एकादशी २०२५: १४२ दिवसांची विष्णुंची योगनिद्रा संपणार; २ दुर्मिळ योगांत ७ राशींचे भाग्य उजळणार
9
२५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्येपूर्वीची शेवटची पोस्ट व्हायरल, चाहते हळहळले
10
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! आतापर्यंत ११,६०० रुपये स्वस्त; आता खरेदी करावे की वाट पाहावी?
11
धावत्या ट्रेनमध्ये तरुणावर हल्ला; तब्बल ५४ वेळा चाकूने वार! वादाचं कारण ऐकून बसेल धक्का
12
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
13
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
14
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
16
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
17
Paytm, Gpay, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
18
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
19
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
20
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या

सोयाबीनला दराची हमी कागदावरच; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची बाजारपेठेत सर्रास होतेय लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 17:10 IST

निसर्गाने मारले असतानाच आता बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली आहे.

हिंगोली : अतिवृष्टी आणि शासकीय उदासीनता, या दुहेरी संकटात जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे कोलमडून गेला आहे. एका बाजूला निसर्गाचा रौद्रावतार, तर दुसऱ्या बाजूला बाजारपेठेतील मनमानी, यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. हमीभावाच्या गप्पा मारणाऱ्या शासनाने मात्र अद्याप हमीभाव खरेदी केंद्रे सुरू केली नाहीत. त्यामुळे सोयाबीन कमी किमतीत खरेदी करून शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असल्याचे चित्र दिसत आहे.

खरीप हंगामात हिंगोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचा पेरा करण्यात आला होता. सुरुवातीला पावसामुळे पीक चांगले हाेते. परंतु, काढणीच्या वेळी अतिवृष्टीने जिल्ह्याला झोडपले. शेतामध्ये पाणी साचले आणि सोयाबीनचे पीक पूर्णत: नष्ट झाले. सततच्या पावसाने सोयाबीन काढणीसाठी शेतकऱ्यांना अनंत अडचणींचा सामना केला. चिखलात रुतलेली यंत्रे आणि शेतात साचलेल्या पाण्यातून शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने सोयाबीन काढून बांधावर आणले. मात्र, काही ठिकाणी एवढा पाऊस मोठा होता की, अनेक भागांत उभ्या सोयाबीनला जागेवरच मोड फुटले. एवढेच नव्हे, तर काढणीनंतरही पावसाने उघडीप न दिल्याने शेतकऱ्यांच्या हाती आलेला माल बुरशीयुक्त, डागी झाला आणि जागेवरच कुजून मातीमोल झाला. हातातोंडाशी आलेले पीक अक्षरश: मातीत मिसळले. निसर्गाने मारले असतानाच आता बाजारपेठेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळायला सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने सोयाबीनला हभीभाव ५३२८ रुपये प्रतिक्विंटल जाहीर केलेला असतानाही, खुल्या बाजारात दर कोसळले आहेत. सोयाबीन डॅमेज आणि मॉइश्चर याचे कारण देत शेतकऱ्यांकडून अत्यंत कमी दरात सोयाबीन खरेदी करत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.

बाजारपेठेत भावासाठी कोणीही आवाज उठवत नाही...सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने व्यापारी खरेदी करतात. याच्या विरोधात कोणीही आवाज उठवत नसल्याने शेतकऱ्यांना गरज असल्यामुळे आपला माल कमी किमतीत विकावा लागतो.

हमीभाव कागदापुरताचडॅमेज सोयाबीन चक्क २५०० ते ३००० रुपये प्रति क्विंटल तर सुस्थितीतील सोयाबीन फक्त ४ हजार ते ४ हजार १०० प्रति क्विंटल या दराने खरेदी केले जात आहे. हे विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या चांगल्या मालासाठीही हमीभावापेक्षा थेट १२०० ते १५०० रुपये प्रति क्विंटलने कमी दर मिळत आहे.

दिलासा देण्यासाठी नितांत गरजअतिवृष्टीमुळे झालेले नुकसान आणि त्यानंतर खुल्या बाजारपेठेत होणारी लूट, या दुहेरी संकटात सापलेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्याला तातडीने सरकारी मदतीची आणि हमीभाव खरेदी केंद्राच्या माध्यमातून दिलासा देण्यासाठी नितांत गरज आहे. - विजय कऱ्हाळे, डिग्रस, शेतकरी

शासन लक्ष देणार तरी कधी?शेतकऱ्यांचे उत्पादन खर्चापेक्षाही कमी दरात विकले जात असताना शासनाने डोळे झाकून बसणे ही अत्यंत निषेधार्ह बाब आहे. शेतकरीहिताच्या गप्पा मारणारे सरकार आमच्या मरणाची वाट बघत आहे काय, असा सवाल बद्रीनाथ शिंदे, शेतकरी, सावा यांनी केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Soybean Farmers Exploited: Guaranteed Price Only on Paper, Losses Mount

Web Summary : Hingoli's soybean farmers face double distress: crop damage from excessive rain and market exploitation. Promised guaranteed prices remain elusive, forcing farmers to sell at drastically reduced rates. Urgent government aid is needed to alleviate their plight and establish purchase centers.
टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र