प्रतिबंध हाच उपाय; अशी तोडा संसर्गाची साखळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:27 AM2021-04-14T04:27:10+5:302021-04-14T04:27:10+5:30

विलंब करू नका याकडे लक्ष द्या कोरोना रुग्णांत टायफाईड, काविळ, डेंग्यू या टेस्ट फाल्स पॉझिटिव्ह असू शकतात. त्यामुळे फक्त ...

Prevention is the solution; Such a broken chain of infection | प्रतिबंध हाच उपाय; अशी तोडा संसर्गाची साखळी

प्रतिबंध हाच उपाय; अशी तोडा संसर्गाची साखळी

Next

विलंब करू नका

याकडे लक्ष द्या

कोरोना रुग्णांत टायफाईड, काविळ, डेंग्यू या टेस्ट फाल्स पॉझिटिव्ह असू शकतात. त्यामुळे फक्त या टेस्ट जरी पॉझिटिव्ह आल्या तरी कोविड असू शकतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. रॅपिड ॲन्टीजन टेस्ट ही दुसऱ्या आठवड्यानंतर निगेटिव्ह असू शकते. ही टेस्ट निगेटिव्ह असली तरीही कोरोना संसर्ग असू शकतो.

तपासणीस विलंब नको

ताप आला की, कोरोनाची चाचणी करून घ्या. ही तपासणी करण्यास विलंब होता कामा नये. या विलंबामुळे अत्यावस्थ रुग्ण वाढत आहेत, तसेच काेरोनाच्या रुग्णांत छातीच्या सिटी स्कॅनमध्ये वेगळ्या निमोनियाचे बदल दिसतात. यावरूनही कोरोनाचे निदान लागू शकते; मात्र अनावश्यक सिटी स्कॅन करणेही टाळावे. चार ते पाच दिवसांत हे बदल झाले असल्यास एक्स रे मध्येही ते दिसतात. वेळेत निदान व उपचार मृत्यूचे प्रमाण टाळू शकते.

प्रत्येकाने ही काळजी आवश्य घ्या

मास्क व्यवस्थित वापरणे, वेळोवेळी हात धुणे, गर्दीत जाणे टाळणे गरजेचे असून कोरोना लस घ्यावी. तर कोरोना झालेल्या रुग्णांना हॉस्पिटलमधून सुटी मिळाल्यावर किमान १ ते २ आठवडे घरात विलगीकरणात राहावे. नियमित योगा, प्राणायाम करावा. व्हिटॅमिनयुक्त आहार घ्यावा. ताजी फळे खाऊन शरिराची रोगप्रतिकारकशक्ती क्षमता वाढवावी, तसेच आयुष्याबद्दलची सकारात्मकता संतुलित ठेवावी.

Web Title: Prevention is the solution; Such a broken chain of infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.