कोरोना काळात पोलीस प्रशासनाने जपली प्रतिष्ठा; लाचेचा मोह आवरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:03 IST2021-09-02T05:03:40+5:302021-09-02T05:03:40+5:30
हिंगोली : कोरोना काळात सर्व व्यवहार ठप्प असताना अशाही काळात लाचखोरांनी लाच घेणे कमी केले नाही. याला गृह ...

कोरोना काळात पोलीस प्रशासनाने जपली प्रतिष्ठा; लाचेचा मोह आवरला
हिंगोली : कोरोना काळात सर्व व्यवहार ठप्प असताना अशाही काळात लाचखोरांनी लाच घेणे कमी केले नाही. याला गृह विभाग अपवाद ठरला आहे. या काळात पोलिसांनी आपल्या खात्याची प्रतिष्ठा जपली. एकाही अधिकारी, कर्मचारी लाच स्वीकारताना आढळला नाही.
कोरोना रोखण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाने पूर्ण पार पाडली. त्यामुळेच या काळात एकाही कर्मचाऱ्याला लाच स्वीकारण्याचा मोह झाला नाही. जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या काळात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ५ कारवाया केल्या. यात ग्रामविकास, शिक्षण, महसूल, वित्त विभागातील कर्मचारी सापळ्यात अडकले.
दोन हजारांपासून तीन लाखांपर्यंतची लाच
लाच स्वीकारण्याची तयारी
वाळूची चोरटी वाहतूक करणारी पकडलेली वाहने लवकर सोडण्यासाठी तीन लाखांच्या लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयार दाखविल्याप्रकरणी हिंगोलीचे तत्कालीन तहसीलदारावर गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई जून महिन्यात करण्यात आली.
वरिष्ठ सहायकावर गुन्हा
साहेबाची ओळख असल्याने बदली करून देतो म्हणून ती केल्याचा मोबदला म्हणून जिल्हा परिषदेतील वरिष्ठ सहायकाने ३० हजार रुपयांची लाच स्वीकारली. ही कारवाई हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ऑगस्ट महिन्यात केली.
प्राचार्यासह एकास २ हजारांची स्वीकारताना पकडले
जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी एकाकडून दोन हजारांची लाच स्वीकारताना प्राचार्यासह खासगी व्यक्तीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले. ही कारवाई सेनगाव येथे १३ ऑगस्ट रोजी करण्यात आली होती.
लाच मागितली जात असेल, तर येथे संपर्क साधा
कोणत्याही शासकीय कर्मचारी, अधिकारी अथवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्ती शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करीत असेल, तर हिंगोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा.
तसेच तक्रारकर्त्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री क्रमांक १०६४, दूरध्वनी क्रमांक ०२४५६-२२३०५५वर संपर्क साधता येईल.
या वर्षभरात झालेली कारवाई अशी...
जानेवारी - ०१
फेब्रुवारी - ००
मार्च - ०१
एप्रिल - ००
मे - ००
जून - ०१
जुलै - ००
ऑगस्ट - ०२