शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

रोटा व्हायरस लसीकरणाबाबत तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 01:07 IST

बालकांमध्ये रोटा व्हायरस विषाणूमुळे होणारा अतिसार आणि यामुळे होणारे बालमृत्यु, कुपोषण रोखण्यासाठी आता जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे रोटा व्हायरसचे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. ८ मे रोजी तालुका टास्क फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

हिंगोली : बालकांमध्ये रोटा व्हायरस विषाणूमुळे होणारा अतिसार आणि यामुळे होणारे बालमृत्यु, कुपोषण रोखण्यासाठी आता जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे रोटा व्हायरसचे बालकांना लसीकरण करण्यात येणार आहे. ८ मे रोजी तालुका टास्क फोर्स समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.नवजात बालकांना रोटा व्हायरस विषाणूमुळे होणाऱ्या अतिसाराचा धोका अधिक असतो. सुरुवातीला सौम्य व नंतर गंभीर स्वरुप धारण करणाºया या रोटा व्हायरस अतिसारामुळे बालकांचा मृत्युही होऊ शकतो किंवा पाच वर्ष वयापर्यंत बालक कुपोषितही होण्याचा धोका असतो. त्यामुळे बालकांना रोटा व्हायरस लसीकरण आवश्यक आहे. मात्र आतापर्यंत आरोग्य विभागाकडून हे लसीकरण केले जात नव्हते. केवळ खाजगी रुग्णालयातच रोटा व्हायरस लस उपलब्ध होती. लससाठी २५० रूपयेपासून ते १ हजारापर्यंत पैसे घेऊन ही लस दिली जात असे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल्या कुटूंबातील नवजात बालकांना रोटा व्हायरस विरोधी लस घेणे शक्य नव्हते. ही बाब लक्षात घेऊन आरोग्य विभागाने आता रोटा व्हायरस लसीकरण मोहिम हाती घेण्याची तयारी केली आहे. साधारणत: जून महिन्यात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे. जून महिन्यात लसीकनरणाची मोहिम सुरु होईल. यापूर्वी केवळ खाजगी रुग्णालयातून दिली जाणारी ही लस आता आरोग्य विभागाकडून मोफत दिली जाणार असल्याने सामान्य जनतेसाठी हा मोठा दिलास आहे. तालुका टास्क फोर्स समितीच्या बैठकीत उपविभागीय अधिकारी, गट वि. अधिकारी, वैद्यकिय अधीक्षक, वैद्यकिय अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गशिअ व इतर समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्या संदर्भात उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांनी सूचना दिल्या.देशात ४० टक्के मुले रोटा व्हायरसचे शिकर बनतातरोटा व्हायरस हा अत्यंत संक्रमणजन्य विषाणू आहे. मुलांमधील अतिसाराचे सर्वात मोठे कारण रोटा व्हायरस आहे. ज्यामुळे मुलांना रुग्णालयात भरती करावे लागू शकते. अन्यथा मुलाचा मृत्यु देखील होऊ शकतो.रोटा संसर्गाची सुरुवात सौम्य अतिसाराने होते व नंतर तो गंभीर रूप घेते. उपचार न मिळाल्यास शरीरातील पाणी व क्षार कमी होतात. पोटदुखी व उलटी होते.आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात ४० टक्के मुले रोटा व्हायरसचे शिकार बनतात. देशात अतिसारामुळे रुग्णालयात भरती होणाºया मुलांपैकी ४० टक्के मुले ही रोटा व्हायरसने संक्रमित असतात.वसमत तालुक्यात दरवर्षी ४८०० मुले बालके जन्माला येतात. त्यामुळे या लसीकरणाचा जिल्ह्यातील ४५०० पेक्षा जास्ता बालकांना फायदा होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्यHingoli z pहिंगोली जिल्हा परिषद