पसंती कोवॅक्सिनला; मिळते मात्र कोविशिल्डच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:52+5:302021-06-22T04:20:52+5:30

हिंगोली : जिल्ह्यात पुरवठा कोविशिल्डचा जास्त होत असला तरीही कोवॅक्सिनला मागणी जास्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र ती ठरावीक ...

Preferred covacin; But only Kovishield! | पसंती कोवॅक्सिनला; मिळते मात्र कोविशिल्डच!

पसंती कोवॅक्सिनला; मिळते मात्र कोविशिल्डच!

Next

हिंगोली : जिल्ह्यात पुरवठा कोविशिल्डचा जास्त होत असला तरीही कोवॅक्सिनला मागणी जास्त असल्याचे दिसून येत आहे. मात्र ती ठरावीक वयोगटालाच दिली जात आहे. दोन्ही लसी सारख्याच परिणामकारक असल्या तरीही कोवॅक्सिनचा दुसरा डोस अवघ्या २८ दिवसांनंतर घेता येत असल्यानेच प्राधान्य दिले जात आहे. जाणकारांचा ओढा कोविशिल्डकडे आहे.

हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत १.४८ लाख लसींचे डोस दिले आहेत. सध्या लसीकरण केंद्रांवरील गर्दी ओसरली आहे. काही खासगी रुग्णालयांनाही आता लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. जिल्ह्यात आता शासकीयसह सर्व ८८ केंद्र झाले आहेत. मात्र त्यातील काहींवर भोपळाही फुटत नसल्याचे दिसते. लस घेतानाही पसंतीला प्राधान्य दिले जात आहे. काहींना कोवॅक्सिनमुळे कुठलाच त्रास होत नाही. शिवाय नंतर २८ दिवसांनीच दुसरा डोस घेता येतो म्हणून ही लस घ्यावी वाटत आहे. तर काहींना कोविशिल्ड ही लस इतर देशांनीही स्वीकारली व जास्त परिणामकारक असून जागतिक स्तरावर ठरलेल्या दिवसांप्रमाणे ६० ते ८४ दिवसांनी दुसरा डोस घेता येत असल्याने कोविशिल्डला पसंती दिली आहे. तर काहीजण फक्त उपलब्ध असलेली लस मिळाली, याच आनंदात आहेत. कोवॅक्सिन घेतल्यानंतर ताप येत नाही, अशीही एक अफवा असल्याने त्यामुळेही काहीजण हीच लस मागताना दिसत आहेत. मध्यंतरी फक्त तरुणांनाच ही लस दिली जात होती. त्यानंतर ठरावीक केंद्रांवर ही लस दिली गेल्याचे दिसून आले.

दोन्ही लसींमुळे सुरक्षितता मिळते

नागरिकांनी कोणती लस परिणामकारक अथवा इतर काही अनुमान लावू नयेत. कोविशिल्ड असो वा कोवॅक्सिन ही लसच सुरक्षा प्रदान करणार आहे. त्यामुळे ती घ्यावी.

डॉ.शिवाजी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी

कोविशिल्ड

पहिला डोस १०२८८२

दुसरा डोस २६०००

कोवॅक्सिन

पहिला डोस १५३२४

दुसरा डोस १००००

दोन्ही लसींचा पहिला व दुसरा डोस

आरोग्य कर्मचारी

पहिला डोस ७१३३

दुसरा डोस ४५६२

फ्रंटलाईन वर्कर

पहिला डोस १३३८२

दुसरा डोस ४५१५

१८ ते ४४ वयोगट

पहिला डोस ६१६०

दुसरा डोस ९०८

४५ ते ६० वर्षे

पहिला डोस ४२७१७

दुसरा डोस १३६६९

ज्येष्ठ

पहिला डोस ४८८३६

दुसरा डोस १२७१०

कोवॅक्सिनलाच पसंती का?

कोवॅक्सिन याच लसीला पसंतीमागे वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. त्यामध्ये प्रमुख कारण म्हणजे दुसरा डोस २८ दिवसांत देता येतो. लस घेतल्यावर ताप येत नाही अथवा त्रास होत नाही. ही लस प्रभावी असल्याचे संदेश व्हॉट‌्सॲपवर मिळत आहेत. मात्र ठरावीक केंद्रांवरच ही लस असल्याने नाईलाजाने कोविशिल्ड घेत आहेत. सुरक्षिततेपुढे पसंतीला महत्त्व दिले जात नाही.

Web Title: Preferred covacin; But only Kovishield!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.