पावसाळापूर्व साफसफाईची कामे हिंगोलीत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:31 IST2021-05-19T04:31:24+5:302021-05-19T04:31:24+5:30
दरवर्षी पालिकेकडून सखल भागात पाणी साचू नये, नाल्या तुंबू नये यासाठी व्यवस्था करण्यात येते. मागील काही वर्षांपासून चांगले पर्जन्यमान ...

पावसाळापूर्व साफसफाईची कामे हिंगोलीत सुरू
दरवर्षी पालिकेकडून सखल भागात पाणी साचू नये, नाल्या तुंबू नये यासाठी व्यवस्था करण्यात येते. मागील काही वर्षांपासून चांगले पर्जन्यमान होते. त्यातच नदीकडील भागात नाल्यांचे पाणी तुंबून अनेकदा ते घरात घुसण्याचा धोका असतो. या पार्श्वभूमीवर ही कामे सुरू करण्यात आली आहेत.
केमिस्ट् भवनजवळील नाला, पारधी वाडा ते नदीपर्यंतच्या नाल्याची जेसीबीच्या साह्याने साफसफाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे शहरातील विविध वार्डात स्वच्छता करण्यासाठी विशेष स्वच्छता पथके तयार करण्यात आली असल्याचीही माहिती यावेळी देण्यात आली. यावेळी स्वच्छता निरीक्षक बाळू बांगर, विजय शिखरे, माजी नगरसेवक चंद्रकांत लव्हाळे, माधव सुकते, राजकुमार शिंदे, अक्षय लव्हाळे, यांच्यासह इतर कर्मचारी उपस्थित होते.