शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

६५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:28 IST

हिंगोली : जिल्हाभरात महावितरणच्या १ लाख ५५ हजार २२५ ग्राहकांकडे डिसेंबरअखेर १२४५४.३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकीत रक्कम भरणाऱ्यांच्या ...

हिंगोली : जिल्हाभरात महावितरणच्या १ लाख ५५ हजार २२५ ग्राहकांकडे डिसेंबरअखेर १२४५४.३४ कोटी रुपयांची थकबाकी आहे. थकीत रक्कम भरणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असली तरी जिल्ह्यात ६५ हजार ३६८ ग्राहकांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित असल्याचे समोर आले आहे. अशा ग्राहकांनी जुनी थकबाकी न भरताच त्याच नावाने अथवा दुसऱ्या नावाने वीज जोडणी घेतली आहे का हे पाहण्याचे निर्देश महावितरणने कर्मचाऱ्यांना दिले आहेत.

जिल्ह्यात महावितरणचे एकूण २ लाख ३० हजार ४८० ग्राहक आहेत. त्यापैकी १ लाख ५५ हजार २२५ ग्राहकांकडे थकबाकी आहे. यात घरगुती ग्राहक १ लाख ४४ हजार ३४५, व्यावसायिक ६ हजार ३५०, लघू उद्योजक १ हजार ९०९, इतर ९९६, पाणीपुरवठा ५४५, पथदिवे १०८० या ग्राहकांचा समावेश आहे. यातील काही ग्राहक नियमित वीज बिल भरणा करणारे आहेत; मात्र तरीही महावितरणच्या थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. सध्या थकबाकी ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने हाती घेतली आहे; मात्र जवळपास ६५ हजार ३६८ ग्राहकांनी वीज बिल भरणा करण्याचे सोडूनच दिले आहे. या ग्राहकांकडून वीज बिलाचा भरणा होत नसल्याने महावितरणने अशा ग्राहकांचा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केला आहे. या ग्राहकांकडील थकीत रकमेचा आकडा आचंबित करणारा आहे. कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडे तब्बल ९६४०.६० कोटींची रक्कम थकीत असल्याचे समोर आले आहे. सध्या महावितरणने अशा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी जुनी थकबाकी न भरता नवीन जोडणी घेतली आहे का हे पाहण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित केलेले ग्राहक

तालुका ग्राहकांची संख्या थकीत रक्कम (कोटीमध्ये)

औंढा नागनाथ १२३९१ २२७३.५१

वसमत १४०४१ २००१.४७

हिंगोली १४१९८ २१०६.३८

कळमनुरी ११६९७ १७१०.८५

सेनगाव १३०४१ १५४८.४०

एकूण ६५३६८ ९६४०.६०