करंजी व परिसरात विजेचा लपंडाव सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:34 IST2021-01-16T04:34:48+5:302021-01-16T04:34:48+5:30
करंजी : वसमत तालुक्यातील करंजी व परिसरात मागील दीड महिन्यापासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. यामुळे वीज ग्राहक कमालीचे ...

करंजी व परिसरात विजेचा लपंडाव सुरूच
करंजी : वसमत तालुक्यातील करंजी व परिसरात मागील दीड महिन्यापासून विजेचा लपंडाव नित्याचाच झाला आहे. यामुळे वीज ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहेत.
गुंडा येथील ३३ के.व्ही. उपकेंद्रातून करंजीसह पाच ते सहा गावांना वीजपुरवठा केला जातो. मागील काही दिवसांपासून करंजी येथील काही विद्युत रोहित्रांना दरवाजे आहेत आणि कुलूप नाही, तर काहींना दरवाजे व कुलूपही नाही. त्यामुळे त्या ठिकाणी धोका होण्याची शक्यता आहे. करंजी गावात तीन तर गावकुसात एक असे चार विद्युत रोहित्र आहेत.
करंजीसह परिसरात यावर्षी चांगला पाऊस झाल्याने रबी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा आदी पिके चांगली बहरली आहेत; परंतु वीज वारंवार खंडित होत असल्यामुळे विहिरीतील पाणी पिकांना देता येत नाही. परिणामी पिके सुकून जात आहेत. महावितरण कंपनीने याची दखल घेऊन परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करून विद्युत रोहित्रांना दरवाजे बसवावेत, अशी मागणी बाळासाहेब भुमरे, बळीराम सोनटक्के, रामा सोनटक्के, दता इंगोले, श्यामराव आव्हाड यांनी केली आहे.