शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले; हाताला काम नसल्याने मजुराने संपविली जीवनयात्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2023 11:48 IST

कुटुंबाचा उदरनिर्वाह ते दुसऱ्याच्या शेतात साला महिन्याने राहून चालवायचे.

कळमनुरी : पाचवीलाच अठरा विसवे दारिद्र्य पूजले आहे. सालाने राहूनही मुला-मुलींचे शिक्षण कसे पूर्ण करावे, या चिंतेतून कोंढूर येथील एका मजुराने आपली जीवनयात्रा संपविली.

कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील मजुराच्या हाताला काम मिळत नसल्याने त्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करून जीवनयात्रा संपविली. ही घटना तालुक्यातील कोंढूर येथे २४ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. गळफास घेतलेल्या मजुराचे नाव विठ्ठल गुलाबराव पतंगे (४०) असे आहे. गत काही महिन्यांपासून रोजंदारीचे काम मिळत नाही. काम मिळाले तर रोजंदारीच्या पैशातून घराचा उदरनिर्वाह होत नाही. त्यातून मुलांच्या शिक्षणासाठी पैसे नाहीत हा ताण मयत विठ्ठल पतंगे यांनी मनावर घेतला. मयताचा मुलगा धोंडिबा पतंगे याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली तर मुलगी श्रावणी ही आठवीला शिक्षण घेत आहे. विठ्ठल पतंगे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार असून, संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी पत्नीवर येऊन ठेपली आहे.

या प्रकरणी आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात याची नोंद झाली आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह ते दुसऱ्याच्या शेतात साला महिन्याने राहून चालवायचे. घरचे अठरा विसवे दारिद्र्य मुलांच्या शिक्षणाला आड येत होते. थोडीबहुत शेती असती तर संसाराला हातभार लागला असता. परंतु त्यांना शेती नव्हती.लोकांचे उसने-पासणे तरी किती दिवस करायचे ही चिंताही नेहमीच त्यांना सतावत असे. आपण दारिद्र्यात जीवन काढले आहे. मुलाला व मुलीला खूप शिक्षण देऊन दारिद्र्यातून बाहेर काढायचे, असे त्यांना वाटायचे. आजमितीस आपण ४० वर्षांचे झालो आहोत. यापुढे मुला-मुलींना शिक्षण द्यायला पैसे मिळतील की नाही? हे काही सांगता येत नाही. या चिंतेतून या मजुराने आत्महत्या केली. पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल शेख अन्सार हे करीत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीHingoliहिंगोली