Poor road condition | जवळा-पळशी रस्त्याची दुरवस्था

जवळा-पळशी रस्त्याची दुरवस्था

पाण्याचे स्रोत आटू लागले

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा गावातील विहीर, बोअर, हातपंपाची पाणीपातळी कमी हाेत आहे. पाणीपातळी खालावली जात असल्याने पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांनाही पाणी पाजण्यासाठी दूरवर जावे लागत आहे.

गावातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष

पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगाव येथील आरोग्य उपकेंद्र, जि.प. प्रशाला व बसस्थानक परिसरात मोठी घाण पसरली आहे. कचऱ्याचे ढिगारे, उकिरडे व नाल्यातील घाण पाणी जमा हाेत आहे. यामुळे गावातील अस्वच्छतेकडे दुर्लक्ष हाेत आहे.

बससेवा सुरू करण्याची मागणी

पांगरा शिंदे : कळमनुरी आगारातून येथे सुरू असणारी बससेवा बंद आहे. यामुळे पांगरा गावासह परिसरातील गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. यामुळे खाजगी वाहनधारक जास्तीचे पैसे घेत प्रवाशांची लूट करत आहेत. यामुळे या मार्गावरील बससेवा सुरू करण्याची मागणी हाेत आहे.

Web Title: Poor road condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.