शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या सतर्कतेने एटीएम चोरीचा डाव उधळला; पोलिस अधीक्षकांकडून अंमलदारांचा सत्कार

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Updated: May 24, 2024 16:38 IST

मराठवाड्यात काही दिवसांपासून एटीएम चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे.

हिंगोली : औंढा ना. तालुक्यातील जवळा बाजार येथील एका एटीएमची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांचा डाव हट्टा पोलिसांनी उधळून लावला. २३ मे रोजी रात्री हट्टा ठाण्याचे पथक या भागात गस्त घालत होते. या पथकाने चोरट्यांचा पाठलाग केल्याने चोरटे जीपसह पळून गेले. 

मराठवाड्यात काही दिवसांपासून एटीएम चोरीच्या घटनांत वाढ झाली आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील चोरीच्या घटनांना आळा घालण्याच्या उद्देशाने पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनीही पोलिस अधिकारी, अंमलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना देत रात्रगस्त वाढविली आहे. तसेच बँक, एटीएम, सोने-चांदीच्या दुकानात सुरक्षा रक्षक नेमण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, २३ मेच्या रात्री  हट्टा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस अंमलदार प्रितम चव्हाण व शेख मदार हे दुचाकीवर जवळा बाजार परिसरात गस्त घालत होते. रात्री १:१५ वाजेच्या सुमारास पथक जवळा बाजार बस स्थानका जवळ आले असता एसबीआय बँकेच्या एटीएम जवळ एक एपी-२३ पासिंगचे असलेली जीप उभी दिसली. त्यात चार-पाच जण असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विषयी संशय आल्याने पथक चौकशी करण्यासाठी जीपकडे जात होते. 

यावेळी पोलिस येत असल्याचे दिसताच जीप वेगाने नागेशवाडीकडे निघून गेली. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेऊन जीपसह पळून गेले. एटीएम चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांना पळवून लावल्याबद्दल पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी  हट्टाचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन बोराटे, पोलिस अमलदार प्रितम चव्हाण, शेख मदार यांना प्रशस्तीपत्र व बक्षीस देवून त्यांचा गौरव केला.

टॅग्स :PoliceपोलिसHingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी