रोख रक्कमेसह मोबाईल लुटणाऱ्यांना पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:33 IST2021-08-28T04:33:12+5:302021-08-28T04:33:12+5:30

सुराणा नगरातील जनार्दन सुभाष नप्ते हे २५ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास शहरातील जि.प. शाळेजवळून जात होते. यावेळी ...

Police cell for mobile looters with cash | रोख रक्कमेसह मोबाईल लुटणाऱ्यांना पोलीस कोठडी

रोख रक्कमेसह मोबाईल लुटणाऱ्यांना पोलीस कोठडी

सुराणा नगरातील जनार्दन सुभाष नप्ते हे २५ ऑगस्ट रोजी रात्री ११ च्या सुमारास शहरातील जि.प. शाळेजवळून जात होते. यावेळी त्यांना थांबवून महेमूद पठाण, आयूब पठाण, (रा. रिसाला बाजार), अफरोज खान, असिफ खान, शोयब खान, युसूफ खान (दोघे रा. आझम कॉलनी) याने त्यांच्या खिशातील १० हजार रुपये किमतीचा मोबाईल व पाकिटासह रोख ७०० रुपये जबरीने हिसकावून घेतले. याप्रकरणी जनार्दन नप्ते यांच्या फिर्यादीवरून हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांना न्यायालयासमोर उभे केले असता दाेन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गंगाधर बनसोडे करत आहेत.

Web Title: Police cell for mobile looters with cash