रस्ता अडवणाऱ्या नऊ वाहनचालकांना पोलिसांचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST2021-07-21T04:20:46+5:302021-07-21T04:20:46+5:30
वारंगा फाटा टी पॉईंटवर काही वाहनचालक वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशी वाहने उभी करीत असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना ...

रस्ता अडवणाऱ्या नऊ वाहनचालकांना पोलिसांचा दणका
वारंगा फाटा टी पॉईंटवर काही वाहनचालक वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, अशी वाहने उभी करीत असल्याची माहिती आखाडा बाळापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार १९ जुलै रोजी दुपारी चारच्या सुमारास कारवाईची मोहीम राबविण्यात आली. यावेळी सचिन वामन खुडे (रा. गुंडलवाडी), नागनाथ नेमाजी खरूडे (रा. सुकळी वीर), भारत पुंजाराम खरोडे (रा. गुंडलवाडी), बालाजी सुभाषराव शिंदे (रा. आखाडा बाळापूर), शेख फरीद शेख हबीब (रा. भाटेगाव), नामदेव भाऊराव गव्हाळे (रा. दाती), सुरेश लक्ष्मण थोरात (रा. मनाठा, ता. हदगाव), अरविंद शंकरराव कदम (रा. भोसी), कोंडिबा माणिक खाडे (रा. येडशी तांडा) हे चालक त्यांच्या ताब्यातील वाहने वाहतुकीस अडथळा निर्माण होईल, तसेच कोणत्याही व्यक्तिला धोका, अटकाव किंवा इजा पाेहोचेल, अशा धोकादायक पद्धतीने उभी केल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोह. गौसोद्दीन हबीब शेख यांच्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोह जी. एच. शेख याबाबत तपास करीत आहेत.