विवाहितेचे हातपाय धरून विष पाजले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:30 IST2021-09-03T04:30:25+5:302021-09-03T04:30:25+5:30
हिना सुलतान खॉ पठाण (रा. लिंबाळा मक्ता) असे पीडितेचे नाव आहे. ऑगस्ट २०२० पासून ३० ऑगस्ट २०२१ दरम्यान ‘तू ...

विवाहितेचे हातपाय धरून विष पाजले
हिना सुलतान खॉ पठाण (रा. लिंबाळा मक्ता) असे पीडितेचे नाव आहे. ऑगस्ट २०२० पासून ३० ऑगस्ट २०२१ दरम्यान ‘तू आम्हाला पसंत नाहीस’, असे म्हणून सासरच्यांनी छळ केला. तसेच ३० ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास तिघांनी हातपाय धरून जीवे मारण्याच्या उद्देशाने विष पाजले. त्यामुळे हिना सुलतान खॉ पठाण यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. याप्रकरणी हिना सुलतान खॉ पठाण यांच्या फिर्यादीवरून सुलतान खान आयुबखान पठाण, अनिसाबी आयुबखान पठाण, आयुबखान नन्हेखान पठाण (रा. लिंबाळा मक्ता) यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, उपविभागीय अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक मळघणे यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास पोलीस निरीक्षक आर.एन. मळघणे करीत आहेत.