पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला पिकअपचा धक्का
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:20 IST2021-07-11T04:20:49+5:302021-07-11T04:20:49+5:30
१० जुलै रोजी सकाळी ११ वाजता शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या ...

पालकमंत्री वर्षा गायकवाड यांच्या वाहनाला पिकअपचा धक्का
१० जुलै रोजी सकाळी ११ वाजता शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यानंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांचा ताफा हिंगोलीच्या रामलीला मैदानाची पाहणी करण्यासाठी निघाला होता. ताफा पिपल्स बँकेजवळ आला असता याच वेळी मोंढ्यातून भरधाव वेगाने पिकअप वाहन मुख्य रस्तावर येत होते. याचवेळी पालकमंत्री गायकवाड यांच्या वाहनाला पिकअपचा धक्का लागला. मात्र प्रसंगावधान राखून पालकमंत्र्यांच्या वाहन चालकाने वाहनाची गती वाढवली. यात पालकमंत्र्यांच्या वाहनाच्या पाठीमागील बाजूचा भाग किंचित घासल्या गेला. सुदैवाने अपघातात कोणालाही इजा झाली नाही. घटनेनंतर पोलिसांनी पीकअप वाहन चालकास ताब्यात घेतले असून शहर पोलीस ठाण्यात नेण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी रामलीला मैदानावर पाहणी केली. दरम्यान, दुपारी २ वाजेपर्यंत हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पिकअप वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला नव्हता.