पेट्रोल पंपाची नासधुस, तीघांविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:20 IST2021-06-17T04:20:58+5:302021-06-17T04:20:58+5:30

जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील असोला पाटीजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर १४ जून रोजी रात्री १० च्या सुमारास झालेल्या ...

Petrol pump vandalism, case filed against three | पेट्रोल पंपाची नासधुस, तीघांविरूद्ध गुन्हा दाखल

पेट्रोल पंपाची नासधुस, तीघांविरूद्ध गुन्हा दाखल

जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील असोला पाटीजवळ असलेल्या पेट्रोल पंपावर १४ जून रोजी रात्री १० च्या सुमारास झालेल्या वादातून आरोपींनी संगनमत करून, फिर्यादीस तू आमचे भांडण सोडण्यास का आला या कारणावरून शिवीगाळ करून धक्काबुक्की केली. फिर्यादीने भीतीपोटी पंपाच्या ऑफिसकडे पळ काढला असता, फिर्यादीस तीन जणांनी काठीने मारहाण करून जखमी केले. तसेच पंपाच्या ऑफिसच्या काचेचे नुकसान केले. तसेच डिझेल टाकण्याच्या मशीनचे काठीणे तोडफोड केली. अंदाचे पेट्रोल पंपाचे एक लाख वीस हजारांचे नुकसान झाले. या बाबतची फिर्याद हट्टा पोलिसांत हनुमान डिगांबर ढोबळे रा. असोला यांनी दिली. याप्रकरणी हनुमान कवाळे, गणेश चव्हाण, कृष्णा वावरे रा. गुंडा ता. वसमत यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा तपास सपोनि गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बी.जी. राठोड हे करीत आहेत.

Web Title: Petrol pump vandalism, case filed against three