पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:26 IST2021-02-08T04:26:32+5:302021-02-08T04:26:32+5:30
हिंगोली : पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोजच वाढ होत असून, ७ फेब्रुवारी रोजी पेट्रोल ९४.६० रुपये तर डिझेल ८३.८२ रूपये ...

पेट्रोलच्या दरात पुन्हा वाढ
हिंगोली : पेट्रोल, डिझेलच्या दरात दररोजच वाढ होत असून, ७ फेब्रुवारी रोजी पेट्रोल ९४.६० रुपये तर डिझेल ८३.८२ रूपये प्रतिलीटर होते. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराने सर्वसामान्यांचे गणित कोलमडले असून, वाहनचालकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस होणारी वाढ कमी होण्याची शक्यता दिसत नसून, दररोज काही पैशांनी वाढ होत आहे. दिनांक २३ जानेवारी रोजी पेट्रोल ९३.५७ रुपये तर डिझेल ८२.६९ रूपये प्रतिलीटर दराने विक्री होत होते. त्यात दररोज काही पैशांनी वाढ होत केवळ पंधरा दिवसात म्हणजे ७ फेब्रुवारी रोजी पेट्रोलमध्ये १ रूपया ३ पैशांनी वाढ होत ते ९४.६० रूपये प्रतिलीटर दराने विक्री होत होते. डिझेलच्या दरातही वाढ झाली असून, पंधरा दिवसात १ रूपया १३ पैशांची वाढ झाली आहे. वाढत्या दराचा फटका दुचाकीवरुन व्यवसाय करणाऱ्यांना बसत आहे. तसेच मध्यमवर्गीयांचे कंबरडेही मोडले असून, पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या दराला लगाम घालावा, अशी मागणी होत आहे.