Petrol, diesel price hike again | पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

पेट्रोल, डिझेलच्या दरात पुन्हा वाढ

हिंगोली : पेट्रोल, डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढच होत असून, २३ जानेवारी रोजी पेट्रोलचा दर ९३.५१ पैसे प्रतिलीटर इतका झाला आहे. डिझेलही ८२.६३ रूपयांवर पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत आहे.

पेट्रोल व डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढच होताना दिसून येत आहे. चार वर्षात पेट्रोल ३३.९५ तर डिझेल २०.०२ रूपयांनी वाढले आहे. जानेवारी २०१७मध्ये पेट्रोल ५९.५६ तर डिझेल ६२.६१ रूपये प्रतिलीटर होते. जानेवारी २०१८मध्ये पेट्रोल ८९.९४ तर डिझेल ६९.८४, जानेवारी २०१९मध्ये पेट्रोल ८१.२० तर डिझेल ६९.२३ रूपये, जानेवारी २०२०मध्ये पेट्रोल ८९.५० तर डिझेल ७०.२१ रूपये प्रतिलीटर होते. १७ जानेवारी रोजी पेट्रोलचा दर ९२.३२ रूपये तर डिझेलचा दर ८१.३७ रूपये प्रतिलीटर होता. सातच दिवसात यात वाढ होत २३ जानेवारी रोजी पेट्रोलचा दर ९३.५१ तर डिझेलचा दर ८२.६३ रूपये प्रतिलीटर झाला आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसत असून, दुचाकीवर व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.

Web Title: Petrol, diesel price hike again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.