तीनशे ग्रॅॅमपेक्षा अधिक वजनाच्या ड्रोनसाठी घ्यावी लागते परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST2021-07-31T04:29:44+5:302021-07-31T04:29:44+5:30
हिंगोली: अडीचशे ते तीनशे ग्रॅमपेक्षा अधिक वजनाच्या ड्रोनच्या साह्याने शूटिंग करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागत आहे. तेव्हा ...

तीनशे ग्रॅॅमपेक्षा अधिक वजनाच्या ड्रोनसाठी घ्यावी लागते परवानगी
हिंगोली: अडीचशे ते तीनशे ग्रॅमपेक्षा अधिक वजनाच्या ड्रोनच्या साह्याने शूटिंग करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून परवानगी घ्यावी लागत आहे. तेव्हा शूटिंग करताना संबंधितांनी काळजी घेणे गरजेचे आहे.
आधुनिक युगात फोटोग्राफी, व्हिडिओ, शूटिंगमध्येही मोठे बदल होऊ लागले आहेत. लग्न समारंभ, वाढदिवस, इतर कार्यक्रमांमध्ये ड्रोनच्या साह्याने शूटिंग, फोटोग्राफी केली जात आहे. सर्वसाधारणपणे ५० फुटांपर्यत ड्रोन उडविण्यासाठी कोणत्याही परवानगीची आवश्यकता नाही. परंतु, त्याकरिता वापरलेला ड्रोनही अडीचशे ते तीनशेपेक्षा कमी वजनाचा असणे आवश्यक आहे.
ड्रोनद्वारे शूटिंगला वाढतेय मागणी...
कॅमेरा घेऊन फोटो काढणे, मोबाइलद्वारे फोटो काढण्याचे दिवस आता संपले आहेत. जो तो आता ड्रोनद्वारे शूटिंग घेण्याची मागणी करीत आहेत. परंतु, यासाठी जास्तीचे पैसेही मोजावे लागणार आहे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. हिंगोली जिल्हा लहान असला तरी येथेही ड्रोनद्वारे शूटिंग करणारे बरेचशे फोटोग्राफर आहेत.
ड्रोन उडविण्यासाठी लायसन हवे !
सर्वसाधारणपणे ० ते ३०० ग्रॅम वजनापर्यंतच्या ड्रोनसाठी लायसनची आवश्यकता नाही. तीनशे ग्रॅमच्या पुढील वजनाच्या ड्रोनला मात्र नागरी उड्डयन मंत्रालय दिल्लीकडून लायसन घ्यावे लागणार आहे. अधिक वजनाचे ड्रोन असेल तर उड्डयन मंत्रालयातून त्यासाठी परवानगीही घ्यावी लागते.
ड्रोन वापरण्याचे असे आहेत नियम....
० ते २५० ग्रॅम वजन असलेले ड्रोन ५० फुटांपर्यत उडवायचे असल्यास कोणत्याही नियमाची परवानगी घेण्याची गरज नाही. २५० ग्रॅम ते २ किलो वजन असलेले ड्रोन २ हजार फुटांपर्यत उडवायचे असल्यास स्थानिक पोलिसांची परवानगी घेणे आवश्यक आहे.
२०० फुटांपेक्षा अधिक उंचीपर्यत ड्रोन उडवायचा असेल तर उड्डयन मंत्रालयाची परवानगी घ्यावी लागणार आहे. छोट्या कार्यक्रमामध्ये ड्रोन उडविण्यासाठी कोणतीही परवानगी गरजेची नसली तरी काळजी घेणे मात्र आवश्यक आहे. बाजारात नॅनो, मायक्रो ड्रोनसह २ ते २५ किलो वजनाचे लहान ड्रोन. २५ ते १५० किलो वजनाची मध्यम आणि दीडशे किलोपेक्षा अधिक वजनाची मोठे ड्रोन उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात सुरू आहेत ड्रोनद्वारे कार्यक्रम....
जिल्ह्यात मागच्या पाच वर्षांपासून ड्रोनच्या साह्याने लग्न सोहळे, वाढदिवसाची, प्रि-वेडिंग शूटिंग केली जाते. संपूर्ण विवाह सोहळ्याऐवजी विवाह लावतानाची शूटिंग करण्यात येते. यासाठी साधारणत: ८ ते १० हजार रुपयांपर्यंतचा खर्च येतो.
-गोपाल बोरकर, फोटोग्राफर संघटना अध्यक्ष, हिंगोली