खड्याने घेतला एकाचा जीव, दोघे गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 19:21 IST2017-08-31T19:21:03+5:302017-08-31T19:21:28+5:30
आडगाव फाट्याजवळ असलेल्या पुलावर खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रक पुलावरून कोसळून एकास जीव गमावला लागला आहे.

खड्याने घेतला एकाचा जीव, दोघे गंभीर जखमी
हिंगोली, दि. 31 : आडगाव फाट्याजवळ असलेल्या पुलावर खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रक पुलावरून कोसळून एकास जीव गमावला लागला आहे. यासोबतच ट्रकचा चालक व इतर एक असे दोन जण गंभीर जखमी आहेत.
बुधवारी (दि.30) मध्यरात्री आडगाव फाट्यावरून अकोल्यास एक ट्रक मुग घेऊन जात होता. या रस्त्यावर अचानक पुलावरील खड्डा चालकाच्या दृष्टीस पडल्याने त्यास चालकाने चुकवाण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याचा ट्रकवरचा ताबा सुटला व ट्रक पुलावरून खाली पडला. यावेळी ट्रकमध्ये असलेले अनील किशन राठोङ,( 27,रा हाकेवाङी ता.पालम. ) हे जागीच ठार झाले. तसेच चालक लक्ष्मण पवार व गंगाधर राठोड हे गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच पोनि जगदीश भडंरवार,जमादार राजेश ठोके, महमद शेख घटनास्थळी धावा घेतली व त्वरित मदत कार्य केले.