शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नेहमीचा प्रकार म्हणून पांगरा (शिंदे)कडे होतोय दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:54 IST

३.२ रिश्टर स्केलची नोंद कुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे सलग दोन वर्षांपासून भूगर्भातून ...

३.२ रिश्टर स्केलची नोंद

कुरुंदा (जि. हिंगोली) : वसमत तालुक्यातील पांगरा (शिंदे) येथे सलग दोन वर्षांपासून भूगर्भातून गूढ आवाज होण्याचा प्रकार नित्याचाच झाला आहे. त्यावर संशोधन होणे आवश्यक आहे. नेहमीचा प्रकार म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शनिवारी दिवसा ४ वाजून ९ मिनिटांनी तर रविवारी पहाटे १२.४१ वाजता भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ३.२ अशी रिश्टर स्केल एवढी झाली आहे.

पांगरा (शिंदे) या गावाची लोकसंख्या ७ हजारांच्या जवळपास आहे. या ठिकाणी सतत भूगर्भातून गूढ आवाज निर्माण होतो. त्यामुळे पांगरा (शिंदे)सह परिसरातील वापटी, कुपटी, शिरळी, राजवाडी या गावांना त्याचा हादरा बसतो. गेल्या दोन वर्षांपासून रात्री-बेरात्री गूढ आवाज होण्याचे प्रकार नित्याचे झालेले आहेत. त्यामुळे या गावातील नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. आवाजाचे संशोधन लावण्याची मागणी ग्रामस्थांनी गेल्या वर्षी प्रशासनाकडे केली होती. अचानकपणे धमाका झाल्यासारखा आवाज निर्माण होऊन जमीन हादरते. त्यामुळे १ ते २ सेकंद जमीन हलते. त्या प्रकारामुळे भीती निर्माण होत आहे अशी संतोष शिंदे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

पांगरा (शिंदे) येथे पाहणीसाठी मंडळ अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. सतत होणाऱ्या गूढ आवाजाचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येणार असून संशोधनाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो. असे वसमतचे तहसीलदार अरविंद बोळगे यांनी सांगितले.

नेमका हा प्रकार काय आहे. अचानकपणे आवाज येऊन जमीन हादरत असते. याचे कारण शोधण्याची गरज असल्याचे मत माजी सरपंच भगवान शिंदे यांनी व्यक्त केले. गूढ आवाजामुळे गावात एका प्रकारे भीती पसरलेली असून गावकऱ्यांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने त्यावर संशोधन करून गावकऱ्यांना त्याची माहिती दिली पाहिजे, असे मत तंटामुक्त समितीचे अध्यक्ष पंजाबराव शिंदे यांनी व्यक्त केले.