राज्यातील धनगर समाजाबांधवांना आरक्षणापासून वंचित ठेवले जात आहे. त्यामुळे आरक्षणाच्या मागणीसाठी २७ आॅगस्ट रोजी धनगर समाजबांधवाकडून भव्य ढोल-जागर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार आहे ...
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ९ संचालकानी १६ आॅगस्ट ला राजीनामे दिले असून त्या पैकी ६ संचालकांचे राजीनामे शनिवारी सभापती डॉ. निळंकठ गडदे यांनी मंजूर केले. उर्वरित तिन संचालकांचे राजीनामे मंजूरीची प्रक्रिया करण्यासाठी प्रंलबीत ठेवले आहेत. ...
कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी १७ आॅगस्ट रोजी काढले. वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्याअंतर्गत दूरक्षेत्र जवळा बाजार पोलीस चौकीत कार्यरत पोहेकॉ शेख खुद्दूस शेख लाल यांच्या निलंबनाच ...
गतवर्षी वाळूघाट लिलावातून अवघा ७ लाखांचा महसूल मिळाला होता. तर वाळू चोरीच्या ५२ प्रकरणांत ८२ लाखांचा दंडच वसूल झाला होता. यंदा एप्रिलमध्ये गेलेल्या दोन घाटांमुळे आधीच ४0 लाखांचा महसूल मिळालेला आहे. ...
शिक्षण विभागाने काही दिवसांपूर्वी बदल्यांसाठी चुकीची माहिती सादर करणाऱ्या शिक्षकांना अपात्र ठरवून कारवाई प्रस्तावित केली होती. मात्र ही संचिकाच विभागीय आयुक्तालयाचा फेरा मारण्यात गहाळ झाली अन् शिक्षणाधिकारीही पुण्याला प्रशिक्षणास गेल्याने अजूनही नवीन ...
आता नरकयातना असह्य झाल्या साहेब... आमच्या गावाकडे जाण्यासाठी ना रस्ता, ना गावात सुविधा. त्यामुळे आता इच्छामरणाची परवानगी द्यावी, अशी याचना २५ कि.मी. पायपीट करून आलेल्या कळमनुरी तालुक्यातील करवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. आ ...
जनतेचा विश्वास संपादन करून कायद्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे असे प्रतिपादन नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक फत्तेसिंह पाटील यांनी आज येथे केले. ...
पती-पत्नी एकत्रिकरण, एकल महिला व इतर कारणांनी बदल्यांमध्ये अन्याय झाल्याची भावना असलेल्या ४२ शिक्षकांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार दिली होती. अशा शिक्षकांच्या प्रस्तावांची फेरतपासणी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...
जिल्हा परिषदेत सत्तेसाठी मांडीला मांडी लावून बसलेल्या शिवसेना व काँग्रेसमध्ये कळमनुरी पंचायत समितीच्या उपसभापती निवडीवरून शीतयुद्धाचा भडका उडाला आहे. पं.स.तील राजकारणाचे पडसाद जि.प.त उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. ...
जिल्ह्यातील मागील काही वर्षात डेग्ंयू आजाराने डोके वर काढले आहे. डासोत्पत्तीवर प्रतिबंध हाच साथीच्या गावात उपाय असून यासाठी हिवताप विभागाकडे केवळ ४ फवारणी यंत्रे आहेत. यावर्षी आतापर्यंत या विभागाने ८ गावांत फवारणी केली. जुलै आखेतपर्यत एकूण १६ हजार ९१ ...