भाजप नेते रामरतन शिंदे यांनी कयाधूच्या पुनर्जीवनासाठी पुढाकार घेतला आहे. नदीकाठातील ४८ गावांत ३१ दिवस पाहणी करणार आहेत. आतापर्यंत सात ते आठ गावांत बैठका झाल्या. रूंदीकरण व खोलीकरणासाठी एकजुटीने सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. ...
मोफत वीज जोडणी देण्याची योजना असलल्या सौभाग्य योजनेत गुत्तेदार करत असलेल्या हातचलाखीकडे वीज वितरणचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. सौभाग्याच्या मीटरसोबत एमसीबी स्विच बसवणे गरजेचे असताना किटकॅट बसवून बोळवण केली जात आहे. गुत्तेदाराने केलेल्या कामाची चौकशी ...
जळालेल्या रोहित्रांचा तिढा काही सुटायला तयार नाही. पैसे भरूनही रोहित्र न मिळालेल्यांचीच रांग इतकी मोठी आहे की, न भरलेल्यांना कायमचेच अंधाराच्या राज्यात जगावे लागणार असल्याचे दिसत आहे. ...
हिंगोलीत असलेल्या गारमाळ भागात भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये रेशन दुकानावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत 15 कार्यकर्ते जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील विद्यासागर विद्यालयातील एका शिक्षकाने चक्क इच्छामरणाची रीतसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनही सादर करण्यात आले आहे. ...
शासनाने संकटग्रस्त पीडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना आणि अनैतिक व्यापारास प्रतिबंधसाठी उज्वला योजना राज्यात कार्यान्वित केली आहे. ...
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व साखरा या दोन मोठ्या गावातील अंतर्गत मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे ३.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे हिंगोली येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर २ नोव्हेंबर रोजी विविध मागण्यासंदर्भात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. ...