जळालेल्या रोहित्रांचा तिढा काही सुटायला तयार नाही. पैसे भरूनही रोहित्र न मिळालेल्यांचीच रांग इतकी मोठी आहे की, न भरलेल्यांना कायमचेच अंधाराच्या राज्यात जगावे लागणार असल्याचे दिसत आहे. ...
हिंगोलीत असलेल्या गारमाळ भागात भाजपा आणि एमआयएमच्या कार्यकर्त्यांमध्ये रेशन दुकानावरुन हाणामारी झाली. या हाणामारीत 15 कार्यकर्ते जखमी झाले असून सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ...
तालुक्यातील खानापूर (चित्ता) येथील विद्यासागर विद्यालयातील एका शिक्षकाने चक्क इच्छामरणाची रीतसर परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनही सादर करण्यात आले आहे. ...
शासनाने संकटग्रस्त पीडित महिलांना आधार देण्यासाठी व त्यांच्या पुनर्वसनासाठी केंद्र शासन पुरस्कृत स्वाधारगृह योजना आणि अनैतिक व्यापारास प्रतिबंधसाठी उज्वला योजना राज्यात कार्यान्वित केली आहे. ...
सेनगाव तालुक्यातील गोरेगाव व साखरा या दोन मोठ्या गावातील अंतर्गत मुख्य रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करण्यासाठी आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे ३.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. ...
महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेतर्फे हिंगोली येथील जिल्हा परिषद कार्यालयासमोर २ नोव्हेंबर रोजी विविध मागण्यासंदर्भात भीक मांगो आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. ...
स्थळ पाहणी रिपोर्टच्या नक्कलेची मागणी करण्याच्या कारणावरून कळमनुरी न. प. येथील क्षेत्रीय अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षकास थापड-बुक्यांनी मारहाण करीत शिवीगाळ केल्याची घटना १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. ...
शाळेपासून पाच किमी अंतरावरील मुलींना दरवर्षी मानव विकास योजने अंतर्गत मोफत सायकल वाटप करण्यात येतात. यावर्षी एकूण १ हजार ९५२ विद्यार्थिनींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार असून त्यासाठी लागणारा ६८ लाख ३२ हजारांचा निधी मानव विकासकडून शिक्षण विभागाच्या ...