मागील सात ते आठ महिन्यांपासून मध्यान भोजन शिजविणाऱ्या स्वयंपाकी मदतनिसांना अद्याप मानधन वाटप करण्यात आले नाही. त्यामुळे स्वयंपाकी मदतनिसांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाकडून तुटपुंजे मानधनही वेळेत दिले जात नाही हे विशेष. ...
येथील सॅक्रेड हर्ट इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन ६ रोजी सकाळी ८.३0 वाजता करण्यात आले. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. ...
अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी खातेदारांच्या जमिनी पोट विभागून व वारसा फेरफार राबविण्यासाठी बोथी येथे घेण्यात आलेल्या महाराजस्व अभियानास प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा गावांतील हजारो आदिवासी शेतकरी या कार्यशाळेत उपस्थित झाले. तर चारशे अर्जदारांनी वारसा ...
जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर नियतव्यय खर्च करण्यासाठी संबंधित विभागांनी तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया पूर्ण करून प्रस्तावित कामे वेळेत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिल्या. ...
जिल्ह्यातील तीन तालुके दुष्काळग्रस्तांच्या यादीत आहेत. उर्वरित दोन तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांमध्ये येण्यासाठी लढा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर केंद्रीय पथकानेही हिंगोली जिल्‘ाकडे पाठ फिरविली असून ना दाद ना फिर्याद अशी गत झाली आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेत शासनाने यापूर्वी कोट्यवधींचा निधी दिला असला तरीही आता हात आखडता घेतला आहे. यंदा दुष्काळी स्थिती असूनही अजून कामांचा पत्ता नसून अवघी दीड कोटींची कामे झाली आहेत. तर या योजनेसाठी अजून छदामही उपलब्ध झाला नाही. इकडूनतिकडून भागविले जात ...
तालुका कृषी अधिकारी कार्यालय २०१८-१९ यावर्षी ३९११ माती नमुने काढण्याचे लक्षांक देण्यात आले होते. २७ नोव्हेंंबर अखेर ३७०३ नमुने काढून कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर येथे तपासणीसाठी सादर करण्यात आले आहे. २१ गावांचे जमीन आरोग्य पत्रिका तयार केल्या असून ७७ ...