ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
लोकनेते गोपीनाथ मुंडे उसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत जिल्हा कामगार अधिकारी कार्यालयातर्फे जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यात विविध राज्यांतून ५ हजारांपेक्षाही जास्त ऊसतोड कामगार दाखल झाले आहेत. मात्र अभियान अंतर्गत केव ...
कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एका बारकडे जाणाऱ्या रस्त्यावर हदगाव तालुक्यातील दोन गटांत झालेल्या हाणामारीतील घटनेप्रकरणी आठ जणांविरुद्ध पोलिसांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...
जिल्ह्यात सध्या गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र या मोहिमेत कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना मानधन दिले जात नसल्याने महाराष्टÑ राज्य जि. प. आरोग्य सेवा संघटनेच्या वतीने मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. ...
महाराष्टÑ राज्य नगर परिषद, नगर पंचायत, ‘ड’ वर्ग महानगर पालिका संवर्ग पदाधिकारी व कर्मचारी संघटनेचा व प्रलंबित मागण्यांबाबत राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन २३ डिसेंबर रोजी कल्याण मंडपम् येथे करण्यात आले होते. ...
लोकसभेची जागा पुन्हा निवडुन आणण्यासाठी बुथ संघटन मजबुत असणे आवश्यक असून, सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक बुथ समित्यांची स्थापना करावी, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव संपतकुमार यांनी केले. ...
सार्वजनिक रस्त्यावरुन नालीत सिमेंटचा पाईप टाकत असताना त्यावरून ट्रॅक्टर नेण्याच्या कारणावरून वाद झाला. यात एकास फायटरने तोंडावर मारून जखमी केले. याप्रकरणी तिघांविरूद्ध आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
मानव विकासकडून गरोदर व बाळंत मातांना बुडीत मजुरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर ही रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरीचा लाभ दिला जाणार आहे. मात्र सदर निधी वाटपाची कामे आरोग्य ...
परभणी हिंगोली राज्य रस्त्यावर औंढा तालुक्यातील जवळाबाजार जवळ १७ मैल परिसरात जवळाबाजारहून हट्ट्याकडे जाणारी क्रुझर जीप क्र. एमएच ३८ व्ही ०९७८ ला शनिवारी ४.५० वाजता उलटल्याची घटना घडली. ...