जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट अंतिम टप्प्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:28 IST2021-04-18T04:28:53+5:302021-04-18T04:28:53+5:30

या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती सुरू झाली तरीही त्याची शुद्धता किती आहे, हे तपासल्याशिवाय तो ऑक्सिजन वापरता येणार नाही. त्याची ...

Oxygen plant in district hospital in final stage | जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट अंतिम टप्प्यात

जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट अंतिम टप्प्यात

या प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मिती सुरू झाली तरीही त्याची शुद्धता किती आहे, हे तपासल्याशिवाय तो ऑक्सिजन वापरता येणार नाही. त्याची अंतिम तपासणी करून एकदा आवश्यक दर्जाचा ऑक्सिजन मिळू लागला की, या प्रकल्पातून निर्माण होणारा ऑक्सिजन साठा वापरता येणार आहे.

गरजेपेक्षा कमी क्षमता

या ऑक्सिजन प्लांटची सध्याच्या गरजेपेक्षा तीन ते चार पट कमी क्षमता आहे. त्यामुळे बाहेरून ऑक्सिजन मागविणे क्रमप्राप्त आहे. मात्र, भविष्यात कोरोनाचा कहर कमी झाल्यावर या रुग्णालयाची गरज पूर्ण करून इतर एखाद्या रुग्णालयाची गरजही येथून पूर्ण होवू शकते. रोज अर्धा टन ऑक्सिजनची निर्मिती होणार असल्याने हे शक्य होणार आहे. तर भविष्यात ऑक्सिजनवरील खर्चही टळणार आहे.

५० ऑक्सिजन मशीनही मागविणार

ऑक्सिजनचा वारंवार प्रश्न निर्माण होत असल्याने जिल्हा रुग्णालयात स्वयंचलित ऑक्सिजन निर्माण मशीन मागविण्यात येणार आहेत. एका रुग्णास ही मशीन पुरेसा ऑक्सिजन देवू शकणार आहे. कमी ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णांसाठी या मशीन उपयुक्त ठरू शकतात.

Web Title: Oxygen plant in district hospital in final stage