दमट वातावरणामुळे भाजीपाल्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:23+5:302021-09-04T04:35:23+5:30
गत आठवड्यापासून दमट व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी अधून-मधून पाऊसही पडत आहे. भाजीपाल्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव ...

दमट वातावरणामुळे भाजीपाल्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव
गत आठवड्यापासून दमट व ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. काही ठिकाणी अधून-मधून पाऊसही पडत आहे. भाजीपाल्यावर करपा रोगाचा प्रादुर्भाव असल्यास शेतकऱ्यांनी अझोक्सिस्ट्रॉबिन १८.२ टक्के, डायफेनकोनॅझोल ११.४ १० मिली, ५ मिली स्टिकर प्रति १० लीटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी.
पावसाने उघडीप दिल्यास भाजीपाल्यावर फवारणी करावी.
मिरची, वांगे, भेंडी, टोमॅटो आदी पिकात रसशोषण करणाऱ्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास पायरीप्रॉक्सीफेन ५ टक्के, फेनप्रोपाथ्रीन १५ टक्के १० मिली किंवा डायमेथोएट ३० टक्के १३ मिली प्रति १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीनंतर तयार असलेला भाजीपाला पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच भाजीपाला पिकात साचलेले पाणी चर काढून शेताबाहेर काढून द्यावे.