अन्यथा १७ सप्टेंबरला बसस्थानक प्रवशांना खुले करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:40+5:302021-09-04T04:35:40+5:30
हिंगोली येथील बसस्थानकाचे काम सुरू असल्याने पर्यायी शेड उभारून त्याद्वारे प्रवाशांना सेवा दिली जात आहे. मात्र फलाट नजीकच असल्याने ...

अन्यथा १७ सप्टेंबरला बसस्थानक प्रवशांना खुले करणार
हिंगोली येथील बसस्थानकाचे काम सुरू असल्याने पर्यायी शेड उभारून त्याद्वारे प्रवाशांना सेवा दिली जात आहे. मात्र फलाट नजीकच असल्याने अनेकदा तेथे बसेस लावण्यास अडचणी येतात. शिवाय पावसाच्या वेळी ही जागा अपुरी पडते. नवीन बसस्थानक झाले असले तरीही त्याचा वापर अजून सुरू नाही. या ठिकाणी मागच्या बाजूने जाऊन प्रवाशांना बसस्थानकात जावे लागते. जर कारभार पूर्ववत सुरू झाला तर प्रवाशांचा हा त्रास वाचणार आहे. शिवाय हे काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटले आहेत. वापराअभावीच इमारत खराब होत आहे. मात्र या बसस्थानकाचे काम पूर्ण झाले असले तरीही जेथे बसेस उभ्या राहणार आहेत, त्या आवारात डांबरीकरण किंवा सिमेंटीकरण झाले नाही. त्यामुळे प्रवाशांची ही गैरसोय कायम राहणार आहे. यावर काय उपाययाेजना होणार? हा प्रश्नच आहे.
दरम्यान, या बसस्थानक १७ सप्टेंबरपर्यंत प्रवाशांसाठी खुले केले नाही तर प्रवाशांच्या उपस्थितीतच ते खुले केले जाईल, असा इशारा आ.मुटकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.