सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:27 IST2021-03-24T04:27:50+5:302021-03-24T04:27:50+5:30
या मेळाव्यास नवभारत फर्टीलायझर प्रा. लि. औरंगाबाद, समस्था मायक्रोफायनान्स सोलापूर या उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये सेल्स रिप्रझेंटेटिव्ह, कस्टमर ...

सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन
या मेळाव्यास नवभारत फर्टीलायझर प्रा. लि. औरंगाबाद, समस्था मायक्रोफायनान्स सोलापूर या उद्योजकांनी सहभाग नोंदविला आहे. यामध्ये सेल्स रिप्रझेंटेटिव्ह, कस्टमर रिलेशनशिप ऑफिसर या पदाचा समावेश आहे. या रोजगार मेळाव्यास सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर Employment/रोजगार या पर्यायावर क्लिक करून ‘Job seeker/नोकरी साधक’ हा पर्याय निवडावा, युजर आयडी व पासवर्डद्वारे लॉग ईन करून प्रोफाईलमधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या पर्यायाद्वारे हिंगोली जिल्हा निवडून रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अर्ज करावे. दहावी पास किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक पात्रता, अभियांत्रिकी पदवी व आयटीआय पास उमेदवारांनी या मेळाव्यास ऑनलाईन सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त प्रा. सो. खंदारे यांनी केले आहे.