कळमनुरीत सायकल रॅलीचे आयोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:20 IST2021-01-01T04:20:29+5:302021-01-01T04:20:29+5:30
कळमनुरी : माझी वसुंधरा अभियानांतर्गत दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता येथील नगर परिषदेच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात ...

कळमनुरीत सायकल रॅलीचे आयोजन
कळमनुरी : माझी वसुंधरा अभियानांतर्गत दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता येथील नगर परिषदेच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढती लोकसंख्या, औद्योगिकरण व स्वयंचलित वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे हवेतील प्रदूषण वाढले आहे. या प्रदूषणामुळे मानवी आरोग्य व पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वांचे संरक्षण करण्यासाठी ‘माझी वसुंधरा’ हे अभियान नगर परिषदेच्यावतीने राबविण्यात येत आहे. नागरिकांनी दुचाकीचा वापर न करता सायकलचा वापर करावा, वाढलेले प्रदूषण रोखावे यासाठी या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारी रोजी सकाळी १०.३० वाजता जलशुद्धीकरण केंद्र येथून ही सायकल रॅली सुरु होणार आहे. या रॅलीमध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्याधिकारी उमेश कोठीकर, अभियंता डाखोरे, ए. डी. दायमा, म. जाकेर यांनी केले आहे. या सायकल रॅलीत नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे, यासाठी नगर परिषदेकडून ३१ डिसेंबर रोजी शहरात दवंडी देण्यात आली.