शिक्षक संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 00:06 IST2018-01-17T00:06:30+5:302018-01-17T00:06:34+5:30

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे (जुक्टा) औरंगाबाद येथील जुक्टाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर १८ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.

 Organization of the Morcha organized by the Teachers Association | शिक्षक संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन

शिक्षक संघटनेतर्फे मोर्चाचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे (जुक्टा) औरंगाबाद येथील जुक्टाचे शिक्षण उपसंचालक कार्यालयावर १८ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
राज्यस्तरीय जुक्टा संघटनेने मागील तीन वर्षांत शिक्षणमंत्र्यांशी तसेच सचिव पातळीवर अनेकवेळा प्रलंबित मागण्यांसंदर्भात सकारात्मक चर्चा केली. परंतु शासनाने अद्याप संघटनेच्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही. जुने प्रश्न निकाली लागले नसले तरीही, नवीन परिपत्रक काढले जात आहेत. त्यामुळे शिक्षकांच्या समस्येत अधिकच भर पडत असल्याने तीव्र आंदोलन केले जाणार आहे.

Web Title:  Organization of the Morcha organized by the Teachers Association