रुग्णसंख्या घटली तरीही मृत्यूचे तांडव कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:31 IST2021-05-08T04:31:05+5:302021-05-08T04:31:05+5:30
७ मे रोजी हिंगोली जिल्ह्यात १३२ नवे रुग्ण आढळले, तर १९७ बरे झाले. अँटिजन तपासणीत ३०४ पैकी ४२ बाधित ...

रुग्णसंख्या घटली तरीही मृत्यूचे तांडव कायम
७ मे रोजी हिंगोली जिल्ह्यात १३२ नवे रुग्ण आढळले, तर १९७ बरे झाले. अँटिजन तपासणीत ३०४ पैकी ४२ बाधित आढळले. यात हिंगोलीत १६६ पैकी १३, वसमतला ४१ पैकी ३, सेनगावात ४५ पैकी १०, कळमनुरीत ३३ पैकी ६ तर औंढ्यात १९ पैकी १० बाधित आढळले. आरटीपीसीआर चाचणीत हिंगोली परिसरात ५२, वसमत परिसरात २, कळमनुरी परिसरात २३, औंढा परिसरात १० तर सेनगाव परिसरात ३ रुग्ण आढळले. बरे झाल्याने १९७ जणांना घरी सोडले. यात हिंगोलीतून ८१, लिंबाळा येथून ७, वसमत येथून २३, कळमनुरीतून २७, औंढा येथून ३९ तर सेनगावातून २० जणांना घरी सोडले.
आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १३८९७ रुग्ण आढळले; तर १२३८७ बरे झाले. सध्या ९४० जणांवर उपचार सुरू आहेत. यांपैकी ४५८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांतील ३२ जण बायोपॅपवर आहेत.
सहाजणांचा मृत्यू
हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. यात डोंगरकडा येथील ६२ वर्षीय पुरुष, ढोलउमरी येथील ५२ वर्षीय पुरुष, सेनगाव येथील ४० वर्षीय महिला, रांजाळा येथील ७० वर्षीय पुरुष, भोसी येथील ८० वर्षीय पुरुषाचा समावेश आहे; तर बावणखोलीतील ६५ वर्षीय महिलेचा नवीन काेविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला.
मागील आठ दिवसांचे चित्र
तारीख रुग्ण मृत्यू
३० एप्रिल २७७ ५
१ मे १९१ ६
२ मे २४९ ५
३ मे २३४ २
४ मे ६५ ४
५ मे १५१ ८
६ मे १२८ ७
७ मे १३२ ६