जिल्ह्यात मंगळवारी हिंगोली परिसरात १७४, कळमनुरी ३६३, सेनगाव १२०, वसमत १५५, औंढा परिसरात १५२ असे ९६४ जणांची रॅपिड अँटिजन तपासणी करण्यात आली. यामध्ये एकही कोरोनाबाधित आढळला नाही. तर हिंगोली परिसरात ८८ जणांची आरटीपीसीआर तपासणी केली असता, यात नाईकनगर येथे एक रुग्ण आढळून आला. मात्र वसमत ३४, औंढा ८१, कळमनुरी परिसरात ८५ जणांची तपासणी केली असता, यात एकही रुग्ण आढळून आला नाही. तर हिंगोली येथील आयसोलेशन वाॅर्डात उपचार घेणारा एक रुग्ण बरा झाला आहे. दरम्यान, आजपर्यंत कोरोनाचे १५ हजार ९५२ रुग्ण आढळले असून, त्यापैकी १५ हजार ५६४ रुग्ण बरे झाले. तसेच आतापर्यंत ३८४ रुग्णांचा मृत्यू झाला. आजघडीला २२ रुग्णांवर उपचार सुरू असून, त्यापैकी १२ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
जिल्ह्यात आढळला केवळ एक कोरोनाचा रूग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:37 IST