शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हांतर्गत बदलीसाठी आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 01:08 IST

कळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ३० मेपासून शिक्षकांना बदल्याकरिता आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून ...

ठळक मुद्देशिक्षकांना ३० मेपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार

कळमनुरी : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यासाठी ग्रामविकास विभागाने ३० मेपासून शिक्षकांना बदल्याकरिता आॅनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक कक्ष अधिकारी सं.ना. भंडारकर यांनी २९ मे रोजी काढले आहे.बदलीपात्र शिक्षकांना बदलीसाठी ३० मेपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहेत. बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या जिल्हा परिषदेने नोटीस बोर्डावर लावल्या आहेत. तसेच शिक्षकांचे मॅपिंग, रिक्त जागा संगणक प्रणालीमध्ये नमूद करण्यात आली आहे. संगणक प्रणालीमध्ये नमूद केलेली माहिती अपडेट करण्याची सुविधा ३० मे रोजी सकाळी ११ वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी बदली पोर्टलमध्ये आपले मोबाईल क्रमांक रजिस्ट्रर करावा. सीईओंनी संगणक प्रणालीमध्ये नमूद केलेली माहिती ओटीपी नमूद करून पाठविल्यानंतर तात्काळ संगणक प्रणालीद्वारे शिक्षकांना संवर्ग-१, संवर्ग-२, संवर्ग-३ व संवर्ग-४ अंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शिक्षकांना अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात वेगळी कार्यवाही करण्याची आवश्यकता नसल्याचेही परिपत्रकात नमूद आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सर्व माहिती अंतीम करून शिक्षकांना बदलीसाठी अर्ज भरण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी व आपल्या स्तरावरून शिक्षकांना कळविण्यात यावे, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.३१ मे २०१९ रोजी १० वर्ष सेवा झालेले व सध्याच्या शाळेत ३ वर्षे सेवा झालेले शिक्षक बदलीस पात्र ठरणार आहेत. कार्यरत शिक्षकांची मॅपिंग करण्यात आली आहे. ३१ मे पूर्वी सेवानिवृत्त होणाºया शिक्षकांची मॅपिंग करण्यात येऊ नये, याबाबतचे परिपत्रकही यापूर्वीच काढण्यात आले होते. ३० मे पासून बदली पोर्टल सुरू होणार आहे. त्यामुळे बदली पात्र शिक्षकांची आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी नेट कॅॅफेवर गर्दी होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHingoli z pहिंगोली जिल्हा परिषदEducationशिक्षणTeacherशिक्षकTransferबदली