जिल्ह्यात २९६ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:34 IST2021-09-14T04:34:47+5:302021-09-14T04:34:47+5:30
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी ‘एक गाव, एक गणपती’ स्थापन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. ...

जिल्ह्यात २९६ ठिकाणी ‘एक गाव, एक गणपती’
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी ‘एक गाव, एक गणपती’ स्थापन करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला. मागील पंधरा दिवसांपासून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी गणेश मंडळांच्या व शांतता समितीच्या बैठका घेऊन कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला असून, तब्बल २९६ गावांमध्ये ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात आली. त्यातून सामाजिक अंतराचे पालन देखील होणार आहे. पोलीस प्रशासनाने गणेशमूर्ती स्थापना मिरवणुकीला परवानगी नाकारली. त्यामुळे गणेश मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. दरम्यान, सुरक्षेसाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.