कारवाडी येथे एकास कत्तीने मारहाण, सरपंचासह सहा जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:20 IST2021-07-02T04:20:59+5:302021-07-02T04:20:59+5:30

कारवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सरपंच प्रियंका खरात यांना आमच्या गैरहजेरीत ग्रामसभा का घेतली, असे सदस्या मंदाकिनी टोंपे यांनी विचारल्यावरून त्यांना ...

One person was beaten at Karwadi, six persons including Sarpanch were booked | कारवाडी येथे एकास कत्तीने मारहाण, सरपंचासह सहा जणांवर गुन्हा

कारवाडी येथे एकास कत्तीने मारहाण, सरपंचासह सहा जणांवर गुन्हा

कारवाडी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये सरपंच प्रियंका खरात यांना आमच्या गैरहजेरीत ग्रामसभा का घेतली, असे सदस्या मंदाकिनी टोंपे यांनी विचारल्यावरून त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करण्यात आली. ही माहिती त्याचे पती बालाजी टोंपे यांना ग्रा.पं. कार्यालयाच्या बाहेर आल्यानंतर त्यांनी सांगितली. त्यावरून बालाजी टोंपे यांनी सरपंचांना जाब विचारला असता दोन अनोखळी व्यक्तींनी कत्ती व खंजीरने मारहाण केली. यात बालाजी टोंपे यांना गंभीर दुखापत झाली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी बालाजी अप्पाजी टोंपे यांच्या फिर्यादीवरून सरपंच प्रियंका शिवाजी थोरात, शिवाजी कानबाराव खरात, कपिल रामराव शेवाळे, ओमसाई शिवाजी थोरात यांच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

Web Title: One person was beaten at Karwadi, six persons including Sarpanch were booked