प्राचार्यासह एकास २ हजारांची लाच स्वीकारताना पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST2021-08-14T04:34:56+5:302021-08-14T04:34:56+5:30

हत्ता (ता. सेनगाव) येथील महाकाली माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार विठ्ठलराव राठोड यांच्यामार्फत तक्रारकर्त्यांने त्यांच्या भाच्याचा जातपडताळणी ...

One person including the principal was caught accepting a bribe of Rs 2,000 | प्राचार्यासह एकास २ हजारांची लाच स्वीकारताना पकडले

प्राचार्यासह एकास २ हजारांची लाच स्वीकारताना पकडले

हत्ता (ता. सेनगाव) येथील महाकाली माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य दिलीपकुमार विठ्ठलराव राठोड यांच्यामार्फत तक्रारकर्त्यांने त्यांच्या भाच्याचा जातपडताळणी प्रस्ताव पाठवून दिला होता. भाचा व मुलीची जातपडताळणी कार्यालय हिंगोली येथून प्राचार्य दिलीपकुमार राठोड यांच्या ओळखीने जातवैधता प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी प्राचार्य राठोड याने तक्रारकर्त्याकडे २ हजारांच्या लाचेची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारकर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. त्यावरून एसीबीच्या पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने शुक्रवारी सापळा लावला. सेनगाव बसस्थानकाजवळील एका मेडिकलमध्ये हनुमान गोरखनाथ रवने (रा. शिंदेफळ) याच्याकडे लाच देण्याचे प्राचार्य राठोड याने सांगितले होते. ही रक्कम हनुमान रवने याने स्वीकारत स्वत:जवळ ठेवत लाच स्वीकारण्यास मदत केली. ही कारवाई पोलीस उपधीकक्षक नीलेश सुरडकर, पोहेकॉ विजय उपरे, पोना तान्हाजी मुंडे, पोना ज्ञानेश्वर पंचलिंगे, पोशि अवि कीर्तनकार, पोना सरनाईक यांच्या पथकाने केली.

Web Title: One person including the principal was caught accepting a bribe of Rs 2,000