जिल्ह्याचा कोरोनाचा एक रुग्ण, एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:20 AM2021-06-22T04:20:50+5:302021-06-22T04:20:50+5:30
रॅपिड अँटिजन टेस्टद्वारे १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. बरे झालेल्या ८ रुग्णांना घरी सोडून देण्यात आले आहे, ...
रॅपिड अँटिजन टेस्टद्वारे १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आली आहे. बरे झालेल्या ८ रुग्णांना घरी सोडून देण्यात आले आहे, तर सोमवारी एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डामध्ये भरती असलेल्या कोरोना रुग्णांपैकी २३ रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन ठेवण्यात आले आहे, तर ३ कोरोना रुग्णांची प्रकृती अतिगंभीर आहे. त्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. एकूण २६ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात आजपर्यंत १५ हजार ९०७ रुग्ण झाले असून, त्यापैकी १५ हजार ४९१ रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे, तर आजघडीला जिल्ह्यात एकूण ३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ३८१ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.