रेल्वेत नोकरी लावतो म्हणून एकाचे दहा लाख लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:28 IST2021-05-15T04:28:25+5:302021-05-15T04:28:25+5:30

वसमत तालुक्यातील शिवपुरी येथील पंडित सुधाकर ढवळे (वय २८) यांची संतोष बनवारीलाल सरोज (रा. बोडेपूर. जि. जोनपूर, उत्तर ...

One lakh was looted as he was getting a job in the railways | रेल्वेत नोकरी लावतो म्हणून एकाचे दहा लाख लुबाडले

रेल्वेत नोकरी लावतो म्हणून एकाचे दहा लाख लुबाडले

वसमत तालुक्यातील शिवपुरी येथील पंडित सुधाकर ढवळे (वय २८) यांची संतोष बनवारीलाल सरोज (रा. बोडेपूर. जि. जोनपूर, उत्तर प्रदेश) याच्यासोबत ओळख झाली होती. रेल्वे खात्यात नोकरी लावून देतो, मात्र यासाठी दहा लाख रुपये लागतील, असे आमिष संतोष सरोज याने पंडित ढवळे यांना दाखविले. नोकरी लागत असल्याने पंडित ढवळे यांनी १९ जुलै २०१८ ते ३१ जुलै २०१९ या काळात संतोष सरोज याच्या बँक ऑफ इंडिया व नांदेड मर्चंट बँक शाखा वसमत या खात्यावर दहा लाख रुपये भरले. मात्र, या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर १३ मे रोजी रात्री या प्रकरणी वसमत शहर पोलीस ठाण्यात पंडित ढवळे यांच्या फिर्यादीवरून संतोष सरोज याच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला. पुढील तपास सपोनि. पंढरीनाथ बोधनापोड करीत आहेत.

Web Title: One lakh was looted as he was getting a job in the railways