कारच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार; एक जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:35 IST2021-09-04T04:35:42+5:302021-09-04T04:35:42+5:30
हिंगोली शहरातील नगरपालिकेकडून शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक स्विफ्ट डिझायर कार इंदिरा चौकाकडे जात होती. ही कार इंदिरा चौक ...

कारच्या धडकेत दुचाकीवरील एक ठार; एक जखमी
हिंगोली शहरातील नगरपालिकेकडून शुक्रवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास एक स्विफ्ट डिझायर कार इंदिरा चौकाकडे जात होती. ही कार इंदिरा चौक परिसरात आली असता कारची एका पॅशन प्रो दुचाकीला जोराची धडक बसली. यात दुचाकीवरील एकजण जागेवरच ठार झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. यावेळी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी किरण चव्हाण, वसंत चव्हाण, तान्हाजी खोकले आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तसेच शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह त्यांचे पथकही दाखल झाले. तसेच राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष जावेद राज, रहिम पठाण, शेख सद्दाम आदींनी जखमीला एका वाहनात उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविले. दरम्यान, अपघातानंतर कार जागेवर सोडून चालकाने पळ काढला. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव अर्शद जाबेर जाऊस(वय ३५) तर जखमीचे नाव सय्यद तुराब (वय ३१)असल्याचे स्पष्ट झाले. हे दोघेही शहरातील आजम कॉलनी भागातील रहिवासी आहेत. अर्शद हा व्यवसायाने पानटपरीचालक होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यातही सायंकाळी उशिरापर्यंत घटनेची नोंद झाली नव्हती.