टिप्परच्या पैशावरून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:28 IST2021-05-24T04:28:33+5:302021-05-24T04:28:33+5:30

अनिकेत अनिल लामतुरे (रा. आनंद नगर बळसोंड) यांनी व गोपाळ उत्तमराव सोळंके (रा. आनंदनगर) यांचा भाऊ प्रदीप यांनी टिप्पर ...

One hit with a tipper's money | टिप्परच्या पैशावरून एकास मारहाण

टिप्परच्या पैशावरून एकास मारहाण

अनिकेत अनिल लामतुरे (रा. आनंद नगर बळसोंड) यांनी व गोपाळ उत्तमराव सोळंके (रा. आनंदनगर) यांचा भाऊ प्रदीप यांनी टिप्पर घेतले होते. मात्र, प्रदीप हा अपघातात मरण पावला. त्यामुळे टिप्परसाठी दिलेले पैसे गोपाळ सोळंके यांच्याकडे मागितले. त्यावेळी माझ्याकडे कशाचे पैसे मागत आहेस. व्यवहार तुझा व प्रदीपचा झाला होता. माझ्याकडे पैसे मागू नको, असे ते अनिकेत लामतुरे यांना म्हणाले. तेव्हा तुझ्या वडिलाचा चेक व प्रदीपने दिलेला बाँड माझ्याजवळ आहे, असे अनिकेत लामतुरे म्हणताच गोपाळ उत्तमराव सोळंके याने लोखंडी गजाने त्यांचे डोके फोडले. तसेच उजव्या पायावर मुक्का मार देत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे अनिकेत यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी अनिकेत अनिल लामतुरे यांच्या फिर्यादीवरून गोपाळ उत्तमराव सोळंके याच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पो.हे. रविकांत हरकाळ करीत आहेत.

Web Title: One hit with a tipper's money