घराच्या बांधकामावरून एकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:30 IST2021-03-17T04:30:34+5:302021-03-17T04:30:34+5:30

याप्रकरणी संजय गंगाराम खिल्लारे (रा. बावनखोली) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय गंगाराम खिल्लारे यांनी घराचे बांधकाम ...

One hit from the construction of the house | घराच्या बांधकामावरून एकास मारहाण

घराच्या बांधकामावरून एकास मारहाण

याप्रकरणी संजय गंगाराम खिल्लारे (रा. बावनखोली) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. संजय गंगाराम खिल्लारे यांनी घराचे बांधकाम करू नका म्हणाल्याने बावनखोली भागातील सुनीता दगडू विणकरे व वैभव दगडू विणकरे यांनी विटेने मारून त्यांना जखमी केले. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. तपास जाधव करीत आहेत.

८४० रुपयांची दारू पकडली

हिंगोली : चोरटी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने देशीदारूच्या बॉटल नेत असताना एका महिलेस शहर पोलिसांनी १६ मार्च रोजी दुपारी ३.१० वाजता पकडले. हिंगाेली शहरातील भारतीय स्टेट बँक परिसरातून एक महिला ८४० रुपये किमतीच्या देशीदारूच्या १४ बॉटल नेत असताना शहर पोलिसाने पकडले. याप्रकरणी पो.न. रघुनाथराव होळकर यांच्या फिर्यादीवरून महिलेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास पाचपुते करीत आहेत.

Web Title: One hit from the construction of the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.