एकदिवशीय ‘विपश्यना’ शिबीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 23:25 IST2018-01-29T23:25:32+5:302018-01-29T23:25:52+5:30
शहरातील छत्रपती शाहूनगर येथील धम्मांकुर धम्मसंस्कार केंद्र येथे २८ जानेवारी रोजी एकदिवशीय विपश्यना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

एकदिवशीय ‘विपश्यना’ शिबीर
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील छत्रपती शाहूनगर येथील धम्मांकुर धम्मसंस्कार केंद्र येथे २८ जानेवारी रोजी एकदिवशीय विपश्यना शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर विपश्यना शिबिराचे संचलन विपश्यना सहायक आचार्य पुज्य भिक्खू पय्यारत्न थेरो (नांदेड) यांनी केले. रविवारी सकाळी ९ वाजता शिबिरास प्रारंभ करण्यात आला. शिबीरानंतर ‘विपश्यना’ या विषयावर पुज्य भन्तेजींचे प्रवचन झाले. नविन साधकांना आनापानसतिची साधना दिली. यावेळी मोठ्या संख्येने साधक शिबीरात सहभागी झाले होते. शिबीराचे आयोजन भिक्खू धम्मशील यांनी केले. धम्मांकुर धम्मसंस्कार केंद्रात विविध कार्यक्रम घेऊन बौध्द तत्वज्ञानाबद्दल मार्गदर्शन केले जाते.