सेनगावात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला
By Admin | Updated: June 26, 2016 15:44 IST2016-06-26T15:44:13+5:302016-06-26T15:44:13+5:30
जिल्यातील सेनगाव तालुक्यात काल राञी पुरात वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह दुपारी दीड वाजता सापडला आहे.

सेनगावात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला
ऑनलाइन लोकमत
हिंगोली, दि. २६ - जिल्यातील सेनगाव तालुक्यात काल राञी पुरात वाहून गेलेल्या दोघांपैकी एकाचा मृतदेह दुपारी दीड वाजता सापडला आहे. दुसर्याचा शोध सुरू आहे. सेनगाव तालुक्यात बोरखेडि पिनगाले येथे ही घटना घडली होती. विनोद चव्हाण यांचा मृतदेह सापडला आहे. तर त्यांचा मुलगा अनिल यांचा मृतदेह सापडत नाही.
अपघातात माय लेक जखमी
हिंगोली - तालुक्यातील कलगाव फाटा येथे टेम्पोची दुचाकिला धड़क लागून माय लेक गंभीर जखमी झाल्याची घटना 26 जून रोजी सकाळी 11.30 वाजता घडली. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गजानन बाबुराव शिंदे (देवठाना), 'रुखमिना बाबुराव शिंदे अशी जखमींची नावे आहेत.